Share

“आता त्या मुलींनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’…?”; राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रकांत पाटलांवर टीका

Published On: 

मुंबई:  खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल ३० मे रोजी सोमवारी जाहीर झाला. यामध्ये मुलींनी नेहमीप्रमाणे नेत्रपदीपक कामगिरी करून दाखविली आहे. या धाग्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत सवाल उपस्थित केला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले चार क्रमांक पटकावत मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. चंद्रकांतदादा, आता त्यांनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?, असा खोचक सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी देखील फेसबुक पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. सदानंद सुळे म्हणाले होते , “हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि हे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत मला नेहमीच वाटत होतं हे स्त्री द्वेषी आहेत जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय”.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!