Share

जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस ; १० जूनला होणार सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर याआधी मुंबई पालिकेनं कारवाई केली होती. आता मुंबई महापालिकेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जुहू येथील अधिश बंगल्यात सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी नोटीस पाठविली आहे. यामुळे नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होत असताना दिसत आहे.

जुहू येथील अधिश  बंगल्याला २००७ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने ‘सीआरझेड’अंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. पण त्यातील २ अटींचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप नारायण राणेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी १० जूनला सुनावणीसाठी त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा किनारा क्षेत्र व्यवस्थापन समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.

नागरिक किंवा कोणत्याही प्राधिकरणाकडून ‘मुंबई उपनगर जिल्हा किनारा क्षेत्र व्यवस्थापन’ समितीकडे तक्रार आल्यानंतर संबंधितांकडून अहवाल मागवला जातो. जेणेकरून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी. त्याअंतर्गत नियमित कार्यवाहीनुसार ही नोटीस बजावण्यात आली असून, १० जूनला नारायण राणेंना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!