Share

IPL 2022 : सचिन तेंडुलकरनं निवडला त्याचा सर्वोत्तम संघ; वाचा कोणाला केलंय कॅप्टन!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ (IPL 2022) संघ निवडला आहे. यामध्ये सचिनने सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या संघाबाबत सांगितले. विशेष म्हणजे त्याने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचाही समावेश केला आहे.

सचिन म्हणाला, ”शिखर धवन आणि जोस बटलर हे माझे सलामीवीर असतील. बटलरसाठी हा हंगाम चांगला आहे. धवनशिवा इतर कोणताही फलंदाज त्याचा जोडीदार होऊ शकत नाही.” केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्यानंतर सचिनने हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात घेतले आहे.

पंड्याबाबत सचिन म्हणाला, ”चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने या मोसमात जबरदस्त फॉर्म दाखवला आणि काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या. त्याच्यात जबरदस्त ताकद आहे, त्याच्या बॅटचा स्विंग सुंदर आहे. या मोसमात हार्दिक हा सर्वोत्तम कर्णधार होता.”

सचिन तेंडुलकरचा संघ –

शिखर धवन, जोस बटलर, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), राशिद खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!