पुणे : आयपीएल २०२२मध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना पंजाबशी होत आहे. या सामन्यात मुंबईच्या नजरा मोसमातील पहिला सामना जिंकण्यावर आहेत. त्यामुळे ते त्वेषाने प्रयत्न करत आहेत. या सामन्यात चाहत्यांना मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे वेगळे रूप पाहायला मिळाले. पंजाबचा स्टार फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनचा बुमराहने त्रिफळा उद्ध्वस्त केला. अचूक टप्प्यावर आलेला यॉर्कर चेंडू लिव्हिंगस्टोनला कळलाच नाही.
मुंबईविरुद्ध पंजाबने चांगली सुरुवात केली. यादरम्यान मयंक आणि धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पंजाबचे फलंदाज मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होते. त्यामुळे पुन्हा एकदा बुमराहवर जबाबदारी आली. बुमराहने १४वे षटक टाकले. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने लिव्हिंगस्टोनला क्लीन बोल्ड केले.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बेसिल थम्पी.
पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 MI vs PBKS : मुंबईला पहिल्या विजयासाठी अजून झुंझावं लागणार? पंजाबनं दिलं १९९ धावांचं ‘गब्बर’ आव्हान!
- ‘शरद पवार हे जातीयवादी नाहीत’; रामदास आठवलेंनी शरद पवारांची केली पाठराखण
- सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही…”; प्रविण तरडेंची पोस्ट चर्चेत
- IPL 2022 : यंदा RCB जिंकणार आयपीएल ट्रॉफी? दिनेश कार्तिकनं दिलं ‘असं’ उत्तर!
- “काळजी घे, दगदग नको करु ! तब्येतीला जप”; पंकजांचा भाऊ धनंजयला धीर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

