पुणे : आज पुण्यातील पत्रकार परिषदेत ५ जून रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्याला जाणार अशी मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून हा सामाजिक विषय आहे यावरही राज ठाकरे बोलले.
भोंग्यांचा त्रास हा हिंदूंनाच होतो असं नाही तर मुस्लिमांनाही त्रास होतो असे राज ठाकरे म्हणाले. ५ जून ला आपला अयोध्या दौरा आहे. हिंदू बांधवांनी तयारीत राहावं आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. तसेच संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हिंदू – ओवेसी अशी टीका केली होती. यावर पत्रकारांनी राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता, राज ठाकरे म्हणाले “मी लवंडे बद्दल बोलणार नाही”. असे म्हणतत ठाकरेंनी संजय राऊतांना पुन्हा टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लाऊडस्पीकरच्या वादावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता खिल्ली उडवली. आता महाराष्ट्रातही नवे हिंदू ओवेसी तयार झाले आहेत, भाजपने महाराष्ट्रात जसा वापर केला तसाच ओवेसींना यूपीमध्ये वापरायचा आहे, पण आम्हाला काही टेन्शन नाही. जनता सर्व काही जाणते, सहन करते आणि प्रतिसाद देते असा टोलाही लगावला होता.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

