Share

IPL 2022: आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर ; वाचा कोणत्या तारखेला कोणाचा सामना!

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआयद्वारे जाहीर करण्यात आले आहे. २६ मार्चपासून स्पर्धेला सुरुवाट होणार हे आधीच जाहीर झाले होते. आता मात्र संपूर्ण स्पर्धेचे औपचारिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेची सुरुवात गत विजेते चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्याने होणार आहे.

आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीला TATA IPL 2022 असे संबोधले जाईल कारण TATA समूह या स्पर्धेचा नवीन प्रायोजक आहे. IPL 2022 मध्ये प्लेऑफ आणि फायनलसह ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यंदा स्पर्धेत १० संघ असल्यामुळे एकूण ७० लीग सामने खेळवले जातील. यंदाच्या हंगामापासून स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजाईंट्स हे दोन नवीन संघ जोडले जाणार आहे.

कोरोनाची परिस्थिती बघता बीसीसीआयने आयपीएलचे लीग सामने मुंबई आणि पुणे या दोनच शहरात खेळवायचे ठरवले आहे. या दोन शहरातील वानखेडे स्टेडियम , ब्राबोन स्टेडियम , डी व्हाय पाटील स्टेडियम आणि एमसीए स्टेडियम या ४ मैदानांवर हे सामने खेळवण्यात येणार आहे. विशेषतः बीसीसीआयने या हंगामात २५% प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे क्रिकेट रसिक यंदाच्या हंगामासाठी अधिक उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!