🕒 1 min read
नवी दिल्ली : युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात सध्या युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत सुद्धा याला अपवाद नाहीये.
भारतातून दर वर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेनमध्ये जात असतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ हा उपक्रम सुरु केला आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आत्तापर्यंत युक्रेनमधून १७ हजार पेक्षा जास्त युक्रेनमध्ये अडकलेले नागरिक भारतात परतले आहेत. तर काही भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी झगडत आहेत.
ऑपरेशन गंगा अंतर्गतच भारत सरकारमधील ४ मंत्री युक्रेनच्या शेजारील देशात गेले आहेत. हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजीजु आणि जनरल वी. के, सिंग हे चार मंत्री युक्रेनशेजारील देशात गेले आहेत. युक्रेनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी हे चार मंत्री युक्रेन शेजारील देशात गेले आहेत. त्यातच आता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी ऑपरेशन गंगा वरूनच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ट्विट करत वरुण गांधी म्हणाले कि,’ भारत सरकारने योग्य वेळेज योग्य निर्णय न घेतल्यामुळे, १५ हजार पेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत. युद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी योग्य राजकारण करणे आणि त्यांना परत आणणे हे भारत सरकारचे कर्तव्यच आहे , युद्धात अडकलेल्यांची सेवा आहे’ अश्या प्रकारे वरुण गांधी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Russia-Ukraine War: इस्त्रायलचे प्रधानमंत्री नफ्ताली बेनेट यांचा मध्यस्थीचा प्रयत्न?
- Russia-Ukraine War: रशियाच्या जोरदार आक्रमणाने युक्रेन चिंतेत ; आता ‘हा’ अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात
- PM Modi Pune Visit: मेट्रोवरून अजित पवारांची नरेंद्र मोदींना खास विनंती; म्हणाले…
- पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा- देवेंद्र फडणवीस
- PM Modi in Pune : पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचं अनावरण

