Share

IPL 2022 GT vs RR : परागचा पारा चढला..! रनआऊट झाल्यानंतर रियाननं अश्विनला दिला ‘असा’ लूक; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला, ज्यामध्ये राजस्थानचा पराभव झाला. या सामन्यात राजस्थान संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने असे काही कृत्य केले, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. प्रथम फलंदाजी करताना फ्री हिटवर तो धावबाद झाला आणि नंतर क्षेत्ररक्षणात त्याने आपला राग दुसऱ्या खेळाडूवर काढला.

राजस्थान रॉयल्सच्या डावातील शेवटचा चेंडू नो बॉल होता, ज्यावर जोस बटलर धावबाद झाला. अशा परिस्थितीत जेव्हा चेंडू फ्री हिट होता, तेव्हा नवीन फलंदाज आर. अश्विन क्रीजवर आला. यश दयालने अश्विनला वाईड चेंडू टाकला. दुसरीकडे रियान पराग क्रीज सोडून धावला. अश्विनने मात्र हलला नाही, चेंडू थेट यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या ग्लोव्हजमध्ये गेला.

VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

साहाने यश दयालला चेंडू दिला आणि रियान पराग धावबाद झाला. यावर परागने आपली चूक मान्य केली नाही. रियान सर्व दोष आर अश्विनचाच असल्यासारखे वागत होता. क्षेत्ररक्षणादरम्यानही मिडऑफवरून धाव घेत रियान परागने चेंडू रोखला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरजवळ देवदत्त पडिक्कलच्या दिशेने टाकला. पण पडिक्कल चेंडूपर्यंत पोहोचला नाही, इथेही परागचा पारा चढला. याच कारणामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!