🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने ऋषभ पंत आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील तुलनेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सचा तर धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कप्तान आहे. गांगुलीने म्हटले, की ऋषभ पंतची धोनीशी तुलना करू नका कारण धोनीकडे खूप अनुभव आहे आणि पंत अजूनही खूप लहान आहे.
गांगुलीच्या मते, पंत आणि धोनीची तुलना योग्य नाही. याचे कारण म्हणजे धोनीने त्याच्या कारकिर्दीत खूप नेतृत्व केले आहे, पंतने नुकतीच सुरुवात केली आहे. पत्रकारांशी बोलताना दादा म्हणाला, ”पंतची धोनीशी तुलना करू नका. धोनीला खूप अनुभव आहे. त्याने आयपीएल, कसोटी आणि एकदिवसीय अशा ५००हून अधिक सामन्यांचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे पंतची त्याच्याशी तुलना करणे योग्य नाही.”
आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वावर बरीच टीका झाली होती. मुंबई इंडियन्सचा फलंदाज टिम डेव्हिडविरुद्ध रिव्ह्यू न घेतल्याने पंतला लक्ष्य करण्यात आले. वास्तविक, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक होते.
Sourav Ganguly said, "don’t compare Rishabh Pant with MS Dhoni. MS has so much experience, has captained 500+ games in the IPL, Tests and ODIs. So it’s not fair for Rishabh to be compared with MS". (To India Today).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 25, 2022
मात्र त्यांचा ५5 विकेट्सनी पराभव झाला आणि संघ आयपीएल २०२२ मधून बाद झाला. ऋषभ पंतने महत्त्वाच्या क्षणी डेव्हिडविरुद्ध रिव्ह्यू घेतला नाही. नंतर रिप्लेमध्ये, पंतने हा रिव्ह्यू घेतला असता, तर डेव्हिड बाद झाला असता आणि दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाची शक्यता वाढली असती.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
