Share

IPL 2022 GT vs RR : फलंदाजाला OUT करूनही राजस्थानच्या गोलंदाजानं कपाळाला लावला हात..! काय घडलं? पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामाच्या प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. राजस्थानने दिलेले १८९ धावांचे लक्ष्य हार्दिक पांड्याच्या संघाने सहज गाठले. या विजयामध्ये गुजरातचा फलंदाज मॅथ्यू वेडचाही मोठा मोलाचा वाटा आहे. त्याने ३० चेंडूत ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण यादरम्यान तो बाद झाला आणि त्याच्या बाद होण्याची चर्चाही आता व्हायरल होत आहे.

१८९ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा सलामीवीर रिद्धिमान साहा लवकर बाद झाला. अशा स्थितीत शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी मोठे फटके खेळून दडपण कमी करून धावांचा वेग वाढवला. दोन्ही फलंदाजांमध्ये ७२ धावांची भागीदारी झाली, दरम्यान ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुबमन गिल दुर्दैवाने धावबाद झाला. यानंतर १०व्या षटकात संघाच्या ८५ धावसंख्येवर वेडही बाद झाला.

ओबेड मकॉय १०व्या षटकात गोलंदाजी करत असताना या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडने मोठा फटका खेळताना चेंडू मिड-विकेटच्या दिशेने हवेत मारला. वेडने हा चेंडू जोरात टोलावला होता. हे पाहून मकॉयला वाटले की आता हा चेंडू सीमारेषेपार जाईल. पण मिड-विकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जोस बटलरने उडी मारून शानदार झेल घेतला. मकॉयने यावेळी डोके खाली घालून स्वतःच्या गोलंदाजीवर निराशा व्यक्त करत होता. मात्र जेव्हा बटलरने हा झेल सुरक्षित पकडला तेव्हा मॅकॉयची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

https://twitter.com/MohitKu38157375/status/1529162423068143616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529162423068143616%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fmatthew-wade-wicket-gt-vs-rr%2F

सामन्यात सुरुवातीला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानने जोस बटलर ८९ धावा आणि कर्णधार संजू सॅमसन ४७ धावा यांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने गुजरातला १८९ धावांचे बलाढ्य लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातकडून फलंदाजी करताना शुबमन गिल ३५ धावा, मॅथ्यू वेड ३५ धावा, हार्दिक पंड्या ४० धावा आणि सामन्याचा हिरो ठरलेल्या डेव्हिड मिलरने ६८ धावांचे योगदान दिले. गुजरातला शेवटच्या षटकात १६ धावांची आवश्यकता होती. या षटकात डेव्हिड मिलरने पहिल्या ३ चेंडूत ३ षटकार लगावत गुजरातला विजय मिळवून दिला. या सामन्यात गुजरातने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!