Share

IPL 2022 : चालू सामन्यात फलंदाजानं घेतला टॉयलेट ‘ब्रेक’ अन्….! गुजरात-पंजाब मॅचमध्ये घडला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात गुजरातने बाजी मारली. मात्र, सामन्यादरम्यान गुजरातचा फलंदाज साई सुदर्शनला एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले. फलंदाजी करत असताना सुदर्शन अचानक सामना सोडून मैदानाबाहेर पळत गेला. त्यामुळे काही काळासाठी खेळ थांबवण्यात आला होता. मात्र, त्याने असे का केले? याचे कारणही पुढे आले आहे.

शुबमन गिलसोबत फलंदाजी करत असताना सुदर्शन अचानक पळत मैदानाबाहेर गेला. अचानक खेळ सोडल्यामुळे बाकीचे खेळाडूही भांबावले. थोड्या वेळानंतर जेव्हा तो मैदानात परतला तेव्हा त्याने टॉयलेट ब्रेक घेतला असल्याचे सांगण्यात आले. सुदर्शनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे २० वर्षीय सुदर्शनचा हा पहिलाच आयपीएल सामना होता.

https://twitter.com/cric_big_fan/status/1512476031550074884?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512476031550074884%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-debutant-sai-sudharsan-keeps-players-waiting-on-ground-amid-toilet-break-during-gujarat-titans-vs-punjab-kings-match-4182853.html

या सामन्यात गुजरातच्या विजयाचा हिरो राहुल तेवतिया ठरला. त्याने शेवटच्या २ चेंडूत २ षटकार खेचत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. तर सुदर्शनने ३० चेंडूत ३५ धावा काढल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!