Share

IPL 2022 : ईद मुबारक..! खास दिवसानिमित्त गुजरातच्या राशिद खाननं बनवली ‘डिश’; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्स (GT) संघाने चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले सोबतच प्लेऑफचे तिकीटही पक्के केले. गुजरात टायटन्सचा उपकर्णधार राशिद खानसह अनेक खेळाडू वेळोवेळी आपले योगदान देत असल्याने संघात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान राशिद खानने ईदनिमित्त खास अफगाणी डिश बनवली आहे.

गुजरातने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राशिद खान ईदनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे. राशिदने अफगाणिस्तानचा प्रसिद्ध पदार्थ रोश बनवला आहे. राशिदने हॉटेलच्या किचनमध्ये खास डिश बनवली आणि सहकारी खेळाडूंनाही खाऊ घातली. ईदच्या निमित्ताने राशिद सुंदर वेशभूषेत होता. त्याने शेरवानीही घातली होती.

त्याचा हा व्हिडीओ शेअर करताना गुजरातने एक खास कॅप्शन दिले. ‘राशीद भाई के हात का खाना…इसे कहते हैं ईद मनाना’ असे गुजरातने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आतापर्यंत ९ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांना फक्त एकच सामन्यात पराभव झाला आहे. गुणतालिकेत १६ गुणांसह हार्दिकसेना अव्वल स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!