संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत पुतना मावशीचं प्रेम दाखवू नये – प्रविण दरेकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास तरी स्थगित झाल्याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिली आहे.
राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार आहोत, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी मोठा विरोध केला होता. आता दौरा रद्द केल्यामुळे राज ठाकरेंवर जोरदार टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता, यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेश मधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध सुरु होता. आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागा त्यानंतरच अयोध्याला या, अशी ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितले आहे. मात्र आता प्रकृतीच्या कारणामुळे तुर्तास तरी राज ठाकरे यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपली सविस्तर भूमिका मांडतील, सविस्तर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे राज ठाकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –


