Share

IPL 2022: दीपक चहरच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट; या तारखेला चेन्नई संघाशी जुळणार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20I मालिकेत दुखापत झाली होती, त्यामुळे तो काही आठवड्यांसाठी बाहेर आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिकव्हरीवर काम करत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर IPLची १५ वी आवृत्तीही खेळू शकणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जात होती. पण आता त्यांच्याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत चहर (deepak chahar) जखमी झाल्याने चेन्नईची चिंता वाढली होती. दीपक चहरला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण आता त्याने शस्त्रक्रिया न करण्याचे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याला कोणतीही दुखापत न होता खेळायचे आहे. अशा स्थितीत चहरला एप्रिलच्या मध्यापर्यंत संघात पुनरागमनाची परवानगी मिळू शकते. जेणेकरून तो उर्वरित आयपीएलचे सामने खेळू शकेल.

दीपक चहरने शस्त्रक्रिया न करण्याच्या निर्णयामागे मोठे कारण T20 विश्वचषक स्पर्धा आहे. त्याला स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळायचे आहे आणि त्यामुळे तो कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याशिवाय, त्याच्या आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सची इच्छा आहे की त्याने लवकरात लवकर सुरतमधील संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, जेणेकरून ते या महत्त्वाच्या खेळाडूवर नजर ठेवू शकतील आणि त्याला लवकर खेळवण्याची तयारी करता येईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!