Share

IPL 2022 LSG vs RCB : मार्कस स्टॉइनिसनं दिली शिवी; OUT झाल्यानंतर गमावलं संतुलन आणि…! पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : मंगळवारी झालेल्या आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (LSG vs RCB) १८ धावांनी पराभूत झाला. या सामन्यादरम्यान लखनऊचा फलंदाज मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) एका घटनेनंतर रागात दिसला. फलंदाजी करताना आऊट झाल्यानंतर स्टॉइनिसने आपले संतुलन गमावले आणि शिवी दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लखनऊचा संघ फलंदाजी करत असताना १९व्या षटकात ही घटना घडली. जोश हेझलवूडने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसला बोल्ड केले. हेझलवूडच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना स्टॉइनिस बोल्ड झाला. हेझलवूडचा चेंडू स्टॉइनिसच्या बॅटची कड घेऊन विकेटवर आदळला. यानंतर स्टॉइनिस अंपायरविरुद्ध चिडताना दिसला. त्याचे शब्द स्टंप मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड केले गेले. पॅव्हेलियनच्या दिशेने जात असतानाही, स्टॉइनिस तोंडावर हात ठेवून काहीतरी बोलताना दिसला, परंतु तो कशाबद्दल बोलत आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.

स्टॉइनिसच्या नाराजीचे कारण म्हणजे पंच ख्रिस गॅफनी यांनी हेझलवूडचा चेंडू वाईड घोषित न करण्याचा निर्णय घेतला. या कृत्यामुळे स्टॉइनिसला शिक्षा भोगावी लागली. आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक आहे.

असा रंगला सामना…

कप्तान फाफ डु प्लेसिसची ९६ धावांची खेळी आणि जोश हेझलवूडने घेतलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG vs RCB ) १८ धावांनी पराभव केला. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या विजयासह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!