Share

IPL 2022 CSK vs MI : पराभवानंतरही धोनीनं केलं गोलंदाजांचं कौतुक! जडेजाबाबत म्हणाला…

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK vs MI) ५ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतरही चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजांचे कौतुक केले. आयपीएलचे दोन सर्वात यशस्वी संघ स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

या सामन्यात नाणेफेक करताना धोनी म्हणाला, ”रवींद्र जडेजा संघाची मजबूत बाजू आहे. संघाचे संयोजन ठरवणारे काही खेळाडू असतात. जडेजा त्यापैकीच एक.” जडेजा दुखापतीमुळे टी-२० लीगच्या चालू हंगामातून बाहेर गेला. पहिल्या ८ सामन्यात त्याने संघाचे नेतृत्वही केले होते. सामन्यानंतर धोनी म्हणाला, ”विकेट काहीही असो, १३० धावांपेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणे कठीण असते. मी गोलंदाजांना विरोधी संघावर दबाव आणण्यास सांगितले. युवा गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, त्यांच्याकडून अनुभवाने काहीतरी शिकायला मिळत आहे. मुकेश चौधरीने सुरुवातीला ३ विकेट घेतल्या. सिमरनजीत सिंगनेही चांगली गोलंदाजी केली.”

आता चेन्नई संघ आयपीएल २०२२ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता संघ व्यवस्थापन पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराचा शोध सुरू करू शकते. १५वा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले होते. तो ४० वर्षांचा आहे. पण जडेजा कर्णधार म्हणून अपयशी ठरला. अशा स्थितीत संघ आता दुसऱ्या युवा खेळाडूला ही जबाबदारी देऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!