Share

“औरंगजेबाच्या कबरी पुढे तुम्ही आज नमाज पडत आहात, त्या…” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण चांगलंच तापलेलं असताना पाहायला मिळत आहे. अशातच काल गुरुवारी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबादेत आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन शिवसेनेसोबतच इतर राजकीय पक्षांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट ओवैसींना इशाराच दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल”.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!