Share

IPL 2022 : धोनी-रोहितच्या चाहत्यांनो…ऐकलं का? चेन्नई-मुंबईच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लीगच्या ५९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) ५ गड्यांनी पराभव केला. यासह महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. चेन्नई हा आठवा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. यापूर्वी २०२०मध्येही संघाची कामगिरी खराब होती. या सामन्यात प्रथम खेळताना चेन्नई संघ १६ षटकात केवळ ९७ धावांवर ऑलआऊट झाला. संघाच्या ७ खेळाडूंना दुहेरी आकडा स्पर्श करता आला नाही. प्रत्युत्तरात मुंबईने १४.५ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले.

लीगच्या १५व्या हंगामातील पहिले आठ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला. मुंबई इंडियन्स आणि चेन्नईचे संघ १३ हंगामात एकत्र आले होते. पण, यंदाचा हे दोन्ही बलाढ्य संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नाहीत. म्हणजेच या दोन्ही संघांनी लाजिरवाणा विक्रम केला. मुंबई हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ ४ विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चेन्नई संघ २०१६ आणि २०१७ मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. स्पॉट फिक्सिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. २०१६ मध्येही मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. मात्र, सीएसकेचा संघ त्या मोसमात उतरला नाही. आयपीएलच्या चालू हंगामात १० संघ मैदानात उतरले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. इतर ३ जागांसाठी ७ संघ भिडणार आहेत. लखनऊचा संघ ८ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाने उर्वरित २ पैकी कोणताही एक सामना जिंकला तर तो थेट बाद फेरीसाठी पात्र ठरेल. राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी या दोघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!