मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्मा याने गुरुवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ३४ धावांची नाबाद खेळी दिली. मुंबईच्या संघाला या मोसमात चांगली कामगिरी करता आली नसली तरी तिलक वर्माने आपल्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात एका बाजूने विकेट पडत असताना तिलक उभा राहिला आणि विजयी खेळी केली.
मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने तिलकची स्तुती करत त्याच्याबाबत भाकीत केले. रोहित म्हणाला, ”तिलक एक अद्भुत खेळाडू आहे. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहे आणि असे शांत मन ठेवणे कधीही सोपे नसते. मला वाटते की तो लवकरच सर्व फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल.”
रोहित पुढे म्हणाला, ”त्याचे तंत्र चांगले आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे, जे सर्वोच्च पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. त्याला चांगली कामगिरी करण्याची आणि सामना पूर्ण करण्याची भूक आहे जेणेकरून त्याला यश मिळेल. तो योग्य मार्गावर आहेत. त्याला फक्त एक खेळाडू म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून कसे चांगले होईल आणि त्याचा खेळ कसा सुधारेल यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”
What a season it's been for Tilak Varma ???? https://t.co/vx5Nlhnh2Q #IPL2022 pic.twitter.com/H1lisnjy4K
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 13, 2022
असा रंगला सामना…
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडला आहे. लीगच्या ५९व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सने चेन्नईला (CSK vs MI ) ५ गड्यांनी हरवले. वानखेडे मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहितने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डॅनियल सॅम्सचा जबरदस्त स्पेल आणि इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला अवघ्या ९७ धावांवर गुंडाळले. चेन्नईकडून कप्तान धोनीने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईने या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना ५ गडी गमावले, पण १५व्या षटकात विजय मिळवला. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ३४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

