मुंबई : आयपीएल (IPL)मधील कामगिरी भारतीय संघासाठी निवड होण्यास एकमेव मापदंड होऊ शकत नाही. मात्र दिनेश कार्तिक आणि राहुल तेवतिया यांनी आपापल्या फ्रेन्चायजींसाठी फिनिशर्सची भूमिका बजावीत आहेत. चांगल्या कामगिरीमुळे त्यांनी आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी चार महिने शिल्लक आहेत. त्या दृष्टीने खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करणे ही निवडकर्त्यांची जबाबदारी असणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघ पुढील महिन्यात भारतात येणार आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होईल. आधुनिक क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका मोलाची ठरत आहे. भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करू शकणारे फिनिशर्स हवे आहेत. फिटनेसच्या मुद्द्यावरून हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनाने मागच्या वर्षीच्या विश्वचषकानंतर मधल्या फळीत दीपक हुड्डा आणि व्यंकटेश अय्यर यांचा प्रयोग करून पाहिला; मात्र दोघेही विश्वासास पात्र ठरू शकले नव्हते.
हार्दिकने आयपीएलमध्ये पुनरागमन करत दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर भारतीय संघात पुन्हा जागा मिळविण्यासाठी स्वत:ला सज्जदेखील केले आहे. हुड्डा आणि हार्दिक आपापल्या संघांसाठी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करीत आहेत. भारतीय संघात या दोघांची वर्णी लागल्यास त्यांना मधल्या फळीतच खेळावे लागणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात व्यंकटेश अय्यरची कामगिरी अत्यंत खराबराहिली आहे. त्यामुळे फिनिशर्सच्या यादीत त्याचे स्थान आता तळाला गेले आहे. भारतीय संघात रवींद्र जडेजाला फिनिशर संबोधले जाते. आता कार्तिक आणि तेवतिया यांची भर पडेल आसे वाटते. तेवतियाने आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळताना अशक्य स्थितीतही सामना खेचून आणण्याची धमक दाखवली आहे. २००४ ला भारताकडून पदार्पण करणारा कार्तिक हा पुन्हा एकदा भारतीय संघात परतण्याच्या निर्धाराने खेळताना दिसतो. त्याच्या आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीवर प्रतिक्रिया विचारल्या आसता, त्याला भारतीय संघात स्थान मिळवायचय, असे कार्तिकने बोलुनही दाखवले आहे.
Best finisher in #IPL2022? We definitely think so! ????????
Incredible stats in the death overs from our very own @DineshKarthik! ????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #TuesdayTrivia pic.twitter.com/rwJWmZt8Jr
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 10, 2022
माजी राष्ट्रीय निवडकर्ते एमएसके प्रसाद यांच्या मते कार्तिक आणि तेवतिया हे नऊ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेमध्ये नक्की खेळतील. हार्दिकला देखील पुनरागमनाची संधी मिळू शकेल. हार्दिक, जडेजा, कार्तिक आणि तेवतिया हे चार जण फिनिशर्सच्या भूमिकेत असतील. कार्तिकने देशासाठी टी-२० प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हार्दिक ऑस्ट्रेलियात संघाचा मुख्य खेळाडू असू शकेल. मी त्याला नियमित गोलंदाजी करताना पाहू इच्छितो. आम्हाला ऑस्ट्रेलियात अष्टपैलू कामगिरीची गरज आहे.
Yeh hai Rahul, stat toh padha hoga ????#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/fFqRybbIYN
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 12, 2022
हार्दिक हा गुजरातसाठी नियमित गोलंदाजी करत नसला तरी त्याने आयपीएल २०२२च्या हंगामात २० षटके टाकली आहेत. फलंदाजीमध्ये चौथ्या स्थानावर येऊन चांगली कामगिरी करत आहे. निवड समितीत प्रसाद यांचे सहकारी राहिलेले सरनदीपसिंग म्हणाले,‘दावेदारी सिद्ध करण्यासाठी हार्दिकला नियमितपणे गोलंदाजी करावी लागेल. संघात तुम्ही केवळ फलंदाज म्हणून खेळू शकणार नाही. कार्तिकला देखील संघात स्थान मिळू शकते. मात्र त्यासाठी त्याला फलंदाज म्हणून खेळावे लागेल. यष्टिरक्षणासाठी ऋषभ पंत कायम असणार आहे. कार्तिकला अनुभव असल्याने त्याची दावेदारी भक्कम वाटते. पाठोपाठ फलंदाज बाद झाले तर कार्तिकला भूमिका बदलायची कशी हे चांगले ठाऊक आहे. तेवतियाने देखील आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

