Share

IPL 2022 CSK vs GT : चेन्नईशी भिडणार हार्दिक पंड्याची गुजरात सेना; काय सांगते हेड टू हेड आकडेवारी? वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६२ वा सामाना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या  दोन संघात खेळला जाणार आहे. हा सामाना दुपारी साडे तीन वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केल्यानंतर आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारी गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवून अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या हंगामात नव्याने समावेश झालेल्या गुजरातने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आणि दोन सामने शिल्लक असताना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. गुजरातने १२ सामन्यांत ९ विजय मिळवून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. चेन्नईविरुध्दचा सामाना जिंकल्यास अव्वल दोनमध्ये स्थान निश्चितच होईल, म्हणजे संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळेल.

दहा संघांच्या गुणतक्त्यात नवव्या क्रमांकावर असलेला गतविजेता चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून प्रतिष्ठा वाचवण्याच्या इराद्याने ते उर्वरित दोन सामने खेळतील. गुजरातने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या मागील सामन्यात ६२ धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली होती. तर चेन्नईला त्यांच्या मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. गुजरातचा युवा सलामीवीर शुबमन गिल, कर्णधार हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा आणि राहुल तेवतिया यांनी हंगामात गुजरातसाठी चांगली फलंदाजी केली आहे. तशीच कामगिरी ते चेन्नईविरुध्दच्या सामन्यात गिरवण्याचा प्रयत्न करतील.

गुजारतला त्यांच्या पदार्पणाच्या मोसमातील उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय मुख्यत्वे कठीण परिस्थितीत परत येण्याच्या क्षमतेला दिले पाहिजे. त्यांच्या खेळाडूंनी बरेच सामने परभवाच्या दारातून खेचून आणले आहेत. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये गुजरातच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही आणि हार्दिकला त्याच्या फलंदाजांकडून सातत्याची अपेक्षा असेल. शेवटच्या सामन्यात, फक्त शुबमन गिल (नाबाद ६३) खेळपट्टीवर फलंदाजी करू शकला आणि संपूर्ण डावात नाबाद राहिला. त्या सामन्यात गुजरातने ४ बाद १४४ अशी स्पर्धात्मक धावसंख्या उभारली आणि नंतर त्याचा बचाव करण्यात यशस्वी झाले. गुजारतकडून यं हंगामात मोहम्मद शमीने सर्वाधिक १६ बळी मिळवले आहेत. फर्ग्युसन त्याच्या वेगवान गोलंदाजीने कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणण्यास सक्षम आहे. राशीदनेही संथ सुरुवातीनंतर पुन्हा लय पकडली असून गेल्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या.

चेन्नईचा संघ यंदाच्या अत्यंत खराब कागिरीतून जात आहे. संघाला १२ सामन्यांत ४ विजय मिळवता आले असून, त्यांचे गुणतालिकेत ८ अंक आहेत. चेन्नईने धोनीच्या जागेवर अष्टपैलू खेळाडू जाडेजाला कर्णधार बनवले. मात्र चेन्नईचा हा डाव अपयशी ठरला आणि चेन्नईने पुन्हा एकदा कर्णधार पदाची जबाबदारी धोनीकडे सोपवली आहे. चेन्नई संघ त्यांच्या उरलेल्या दोन सामन्यात विजय मिळवून हंगामचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न करेल.

हेड टू हेड आकडेवारी

या दोन्ही संघामध्ये एकच सामना खेळला गेला आहे. हा सामाना १७ एप्रिलला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर खेळवला गेला होता. यामध्ये गुजरातने विजय मिळवला होता. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थित राशिद खानने कर्णधारपद भूषविले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!