Share

IPL 2022 : दिनेश कार्तिक लिव्हिंगस्टोनपेक्षा सरस..! आरपी सिंगनं दिलेलं मत तुम्ही वाचलं का?

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिनिशर फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik ) सध्या चांगल्या फॉर्मात आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने कार्तिकबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ”कार्तिक तेव्हाच चुका करतो, जेव्हा त्याचे मन स्पष्ट नसते. त्याला जेवढे कमी चेंडू खेळायला मिळतील, तो तेवढे चांगले खेळतो”, असे आरपी सिंगने म्हटले.

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिक पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात फ्लॉप ठरला. त्याला ११ चेंडूत केवळ ११ धावा करता आल्या. मात्र, १३ डावांत तो यंदाच्या मोसमात केवळ पाचव्यांदा बाद झाला आहे. त्याचा स्ट्राइक रेट या मोसमात सर्वोत्तम राहिला आहे. त्याने १९२.५७च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

आरपी सिंग म्हणाला, ”अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिक माझा बॅचमेट होता. तेव्हाही तो धावबाद व्हायचा, त्यात कोणताही बदल झालेला नाही. जेव्हा तो जास्त विचार करतो,, तेव्हा त्यांच्याकडून चुका होतात. त्याला कमी विचार करण्याची संधी द्या, तो खूप चांगला खेळेल. फक्त १० चेंडू शिल्लक आहेत, हे जेव्हा त्याला कळते तेव्हा तो चांगला खेळतो. जेव्हा चेंडू त्याच्या रडारवर असेल तेव्हा तो मारेल. हे त्यांच्या देहबोलीवरूनच कळेल. या क्रमांकासाठी तो परिपूर्ण फलंदाज आहे. त्याची तुलना लियाम लिव्हिंगस्टोनशी केली, तर कार्तिक त्याच्यापेक्षा सरस आहे. कार्तिकने जबरदस्त खेळी खेळून आपल्या संघासाठी सामने जिंकले आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!