🕒 1 min read
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत (IND vs SA) टीम इंडियाच्या काही अनुभवी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. यात रोहित शर्मा आणि केएल राहुल हे खेळाडू असण्याची शक्यता आहे. आगामी इंग्लंड दौरा डोळ्यासमोर ठेवून असे होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांनाही संघात स्थान दिले जाणार नाही.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, की भारताच्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना किमान साडेतीन आठवडे पूर्ण विश्रांती मिळेल. रोहित, विराट, केएल, ऋषभ आणि जसप्रीत बुमराह थेट इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. कसोटी सामन्यानंतर टी-२० मालिका होणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी आम्हाला आमच्या सर्व खेळाडूंना ताजे ठेवायचे आहे.
हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी प्रभावी कर्णधारपद भूषवले आहे. अशा स्थितीत त्याला कर्णधार बनवले जाऊ शकते. यात शिखर धवनही दावेदार आहे. या दोघांपैकी एकावर आयर्लंडविरुद्धच्या छोट्या दौऱ्याची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ सर्व कसोटी सामने खेळू शकला नव्हता. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया एकही सामना खेळू शकली नाही. यानंतर कसोटी सामना पूर्ववत करण्यात आला आहे. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने जिंकले होते तर एका सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत मालिका जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघाला मजबूत आणि फ्रेश संघ घ्यायचा आहे, असे म्हणता येईल. आता इंग्लंडमध्ये जो रूटच्या जागी बेन स्टोक्सला कर्णधार बनवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
