मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये हंगामाच्या ५५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) ९१ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर प्लेऑफची शर्यत कठीण होत चालली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांकडून चाहत्यांना खूप आशा होत्या. पण यावेळी हे दोन्ही संघ पूर्णपणे अपयशी ठरले. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२मधून बाहेर पडला असला तरी चेन्नई सुपर किंग्जसाठी अजूनही आशा कायम आहे.
धोनीने चेन्नई सुपर किंग्जची सूत्रे हाती घेतल्याने संघाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघ अधिक आत्मविश्वासाने खेळताना दिसत आहे, ज्याचे फळ विजयाच्या रूपात मिळत आहे. चेन्नईने दिल्लीचा पराभव करून मोसमातील चौथा विजय नोंदवला आणि चांगल्या नेट रनरेटसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर कब्जा केला.
Can #CSK still push for a Playoffs spot this year? ????
MS Dhoni isn't getting ahead of himself… #IPL2022 #CSKvDC pic.twitter.com/vt6Jm9c0E8
— Cricbuzz (@cricbuzz) May 9, 2022
प्लेऑफसाठी चेन्नई सुपर किंग्जला त्यांचे उरलेले तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तसेच, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि पंजाब यांनी त्यांच्या ३ पैकी किमान दोन सामने गमावले पाहिजेत अशी प्रार्थना चेन्नईने केली पाहिजे. चेन्नईचे आता ११ सामन्यांत ४ विजयांसह एकूण ८ गुण झाले आहेत. त्यांनी आपले उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकले तर त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कायम आहे.
दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर धोनीला याबाबत विचारले असता त्याने या समीकरणांना साफ नकार दिला आणि म्हटले, ”एकावेळी एक सामना घेणे योग्य आहे. मी गणितात कमकुवत आहे, शाळेच्या दिवसातही चांगले नव्हते. तुम्ही तुमचे नशीब स्वतःच लिहिता आणि त्यासाठी तुम्हाला नेहमीच तुमचे सर्वोत्तम द्यावे लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

