🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्या जामिनावर बाहेर आल्या असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
नवनीत राणा यांचे ‘ते’ वक्तव्य-
कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.”
दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने घातलेल्या अटी आणि शर्तीचे त्यांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे आम्ही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. कारण त्यांनी जामिनाच्या अटीचे उल्लंघन केले आहे. असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “… ही खंडणी नाही का?”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर ट्वीट करत आरोप
- “…वारसदार म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वासाठी एक भरीव काम केल्याचे उदाहरण सांगावे”, ‘मनसे’चे शिवसेनेला आव्हान
- “भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर…”, छगन भुजबळांनी ट्वीट करत केले अभिवादन
- “…प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील”, पंजाबमधील ‘त्या’ घटनेवर संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 CSK vs DC : चेन्नईचा दिल्लीवर ‘सुपर’ विजय; तब्बल ९१ धावांनी पाजलं पराभवाचं पाणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
