Share

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला आदेश दिला, तर मी राणा…”, अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान

Published On: 

बीड : कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा यांनी “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.”, यानंतर राजकीय क्षेत्रातून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या प्रकरणी मोठे विधान केले आहे.

“राणे चार आणेसारखी गोष्ट करत आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जर मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवेन.”, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्या जामिनावर बाहेर आल्या असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!