Share

“त्याची गोलंदाजी पाहून मला वकार युनिस आठवला”; भारताच्या माजी खेळाडूने केले उमरान मलिकचे कौतुक

Published On: 

मुंबई: उमरान मलिक या आयपीएल हंगामातील सर्वात प्रभावशाली युवा गोलंदाज ठरला आहे. तो प्रत्येक सामन्यात १५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असल्याने चर्चेत आला आहे. केकेआर विरुद्ध सामन्यात त्याने श्रेयस अय्यरला अप्रतिमरीत्या बाद केले होते. ज्यानंतर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने त्याला जम्मू आणि काश्मीर संघाच्या शिबिरात पहिल्यांदा पहिल्याची आठवण सांगितली आहे.

इरफान पठाणने (Irfan pathan) खुलासा केला की उमरानने (umran malik) त्याला पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनिसची (Waqar Younis) आठवण करून दिली. “ मी त्याला पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरसाठी खेळताना गोलंदाजी करताना पाहिले होते आणि मी कोच होतो. आणि त्याला गोलंदाजी करताना पाहून मला महान वकार युनूसची आठवण झाली,” उमरान मलिकने त्या सामन्यात शेवटच्या षटकात एकही धावा न देता ४ विकेट्स घेतल्या होत्या.

उमरान मलिक हा जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाचा भाग होता जिथे इरफान खेळाडू आणि मार्गदर्शक होता. २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या टी नटराजनला कोरोना झाल्याने त्याच्या जागी मलिकची निवड केली होती. त्याने राज्यासाठी फक्त दोन प्रथम श्रेणी खेळ, एक टी- २०आणि एक लिस्ट ए गेम खेळला होता, परंतु विराट कोहली आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही त्याने आयपीएल मधील कामगिरीने प्रभावित केले होते. .

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!