Share

दुखापतीतुन बाहेर येत दीपक चहरने केली परतीची तयारी; म्हणाला “दिल ये जिद्दी है”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2021 च्या चॅम्पियन CSK संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर सध्या दुखापतीमुळे चर्चेत आहे. कारण १५ वा हंगाम अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे आणि आतापर्यंत त्याच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्याबद्दल कोणतेही मोठे अपडेट दिलेले नाही. पण, पहिल्या काही सामन्यांमध्ये तो सहभागी होणार नसल्याचे वृत्त आहे. दीपक चहर दुखापतीतून सावरण्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळताना दिसत आहे.

दीपक चहर (Deepak chahar) दुखापतीमुळे १५ व्या मोसमातील बहुतेक सामन्यांमधून बाहेर राहू शकतो, अशी बातमी अलीकडेच आली होती. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पण, त्याला झालेली दुखापत खूप गंभीर आहे. मात्र, तो जीममध्ये ज्या प्रकारे घाम गाळताना दिसतोय त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्याला विश्रांती घ्यायला अजिबात आवडत नाही.

https://www.instagram.com/reel/CawxXRKp06s/?utm_source=ig_web_copy_link

दीपक चहरने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओ सोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘दिल ये जिद्दी है.’ श्रीलंका विरुद्ध झालेल्या मालिकेत दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याची आयपीएल मध्ये चेन्नई संघात कधी वापसी होईल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!