Share

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सनं चाहत्यांना दिली ‘गूड न्यूज’; पाहा PHOTO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीसह दिल्लीने त्यांच्या विरोधी संघांना सावध केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. नॉर्कियाचे दिल्ली संघात सराव करतानाचे फोटो व्हायरल झाले.

दिल्लीने नॉर्कियाला रिटेन केले होते, पण पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो आतापर्यंत संघाने खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला आहे. आता तो प्रशिक्षणात परतला असून, तो किती लवकर पुनरागमन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिल्लीला आपला पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ७ एप्रिलला (गुरुवारी) खेळायचा आहे.

२०२०च्या हंगामात ख्रिस वोक्सच्या अनुपस्थितीमुळे नॉर्कियाला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. वोक्सच्या जागी दिल्लीने त्याला करारबद्ध केले. त्याने कगिसो रबाडाच्या साथीने वेगवान गोलंदाजी करत दिल्लीला अंतिम फेरीत नेले. १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या नॉर्कियाने दिल्लीकडून खेळलेल्या दोन मोसमात चमकदार कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!