🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या हंगामात बऱ्याच नविन चेहऱ्यांनी प्रभावीपणे स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आयपीएल (IPL 2022) हंगाम पार पडल्यानंतर भारतीय संघ १० दिवसांनंतर साऊथ अफ्रिकाविरुद्ध भारतातच ५ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. भारत आणि अफ्रिकेमध्ये ९ जून ते १९ जूनपर्यंत टी२० मालिका खेळण्यात येणार आहे. अशातच सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला दिलासादायक माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, असे किती गोलंदाज आहेत जे १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतात? असे सवाल उपस्थित करत जर उमरान मलिकची निवड टीम इंडियासाठी झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
I see debates on #UmranMalik playing T20Is for India. Just a few opinions.
Any cricket aficionado would be an admirer of his athleticism and express pace. And at that pace, you can mess up even the best batter's footwork/game. There is that psychological effect.
(Cont) pic.twitter.com/bC3p2WZGXw
— Bharath Ramaraj (@Fancricket12) May 16, 2022
उमरान मलिककडे वेगवान मारा करण्याची क्षमता आहे. आम्हाला त्याचा वापर खुप सावधगिरीने करावा लागणार आहे. असे सांगत ते म्हणाले, मला कुलदीप सेनदेखील पसंत आहे. यासोबत टी नटराजननेदेखील पुनरागमन केलं आहे. तसेच, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील टीम इंडियाच्या ताफ्यात असतीलच. मी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीने खुप खूश आहे. आयपीएल १५व्या सीझनमध्ये उमरान मलिकने १५७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.
Push him when does well, Back him when he doesn’t. He is still young but with tons of potential. well done my boy #UmranMalik
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 14, 2022
अफ्रिकेविरुद्ध खेळल्यानंतर भारतीय संघ ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहे. २६ जून ते २८ जूनपर्यंत आयरलँडविरुद्ध दोन सामन्यांची टी२० सीरीज खेळणार आहेत. भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लडविरुद्ध १ टेस्ट, ३ वनडे आणि ३ टी२० मॅच खेळणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे रद्द झालेली पाचवी कसोटी पूर्ण करण्यासाठी भारत ही एकमेव कसोटी खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
