🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्या मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. या सामन्यातून आयपीएलमध्ये पर्दापण करणाऱ्या ‘बेबी एबी’ म्हणेजच
डेवाल्ड ब्रेविसने सगळ्यांना त्याच्या फटकेबाजीने पराभवीत केले आहे.
बेबी एबीला (Dewald brevis) मुंबई इंडियन्सने (MI) आज तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला पाठवले. ज्यात त्याने १९ चेंडूत शानदार २९ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या फटकेबाजीच्या शैलीत सगळ्यांना पुन्हा एकदा एबीचे (AB De Villiers) दर्शन झाले. यावेळी त्याने एबी सारखा ‘नो लूक’ शॉटही लगावला. डेवाल्डने पहिल्याच सामन्यात क्रिकेट रसिकांना प्रभावित केले आहे.
सामन्यात संघासाठी पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत मुंबई इंडियन्सला २० षटकात ४ बाद १६१ अशी धावसंख्या गाठून दिली आहे. शेवटच्या षटकात कायरन पोलार्डने केलली फटकेबाजी मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंददायी ठरली. आता फलंदाजीनंतर मुंबई संघ स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी क्षेत्ररक्षणात जोर लावेल.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 MI vs KKR: रोहित शर्माचा ‘फेव्हरेट शॉट’च ठरला अडचणीचा, उमेश यादवने जाळ्यात अडकवले!
- IPL 2022 KKR vs MI : सूर्यकुमारचं दमदार पुनरागमन..! मुंबई इंडियन्सचं कोलकात्याला १६२ धावांचं आव्हान
- IPL 2022: ‘जेव्हा ‘तो’ चांगला खेळतो तेव्हा मला माझ्या स्वतःच्या मुलाने परफॉर्म केल्यासारखे वाटते’; एमएसके प्रसादचे मोठे वक्तव्य
- VIDEO : “तू कोहिनूर हिरा गमावलायस..”, जेव्हा गब्बरला मिळाला होता मुलीकडून नकार; वाचा नेमंक प्रकरण काय?
- “…त्यांनी सिद्ध केलं कि ईडी त्यांच्यासाठी काम करते”- प्रणिती शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
