🕒 1 min read
बंगळुरू : आयपीएल मेगा ऑक्शनची सुरुवात झाली आहे. ऑक्शनमधील सर्वात पहिला खेळाडू शिखर धवन ठरला आहे. त्याची बेस प्राईस २ कोटी इतकी होती. शिखराला आपल्या संघात घेण्यासाठी त्याचा माजी संघ दिल्ली आणि राजस्थान मध्ये मोठी चढाओढ दिसली. मात्र पंजाबने या चढाओढीत उडी घेत दिल्लीला टक्कर दिली आहे. पंजाब किंग्सने शिखर धवनला ८.२५ कोटींमध्ये खरेदी केले आहे.
शिखर धवन आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, धवन आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे परतला. आणि त्याने सांघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने ५२१ धावा केल्या. २०२० मध्ये, त्याने आपला खेळ आणखी प्रभावी बनवला आणि त्या सीझनमध्ये ६०० धावांचा पार केल्या आहेत. तसेच IPL कारकिर्दीत प्रथमच शतक दोन लगातार शतक झळकावले. २०२१ च्या हंगामात पहिल्या सहामाहीनंतर तो धावांच्या यादीत सर्वात वर होता. दिल्लीने त्याला २०२२ साठी रिटेन केले नव्हते.
१९२ आयपीएल सामन्यांमध्ये धवनने ५७८३ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १०६ धावा आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीनंतर धवन हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 AUCTION: हे काय! यंदा किंग खान नव्हे तर सुहाना आणि आर्यन सांभाळणार ऑक्शनमध्ये केकेआरची मालकी
- “…अन् त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस दावणीला बांधले जातात”, रुपाली चाकणकरांचा संताप
- “…भाजपचा हाच दुटप्पीपणा मराठा व ओबीसी आरक्षणासाठी दिसला”, लतादीदी स्मारक वादावरून सचिन सावंतांचा आरोप
- “राष्ट्रवादी राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देणार का?”, भातखळकरांचा सवाल
- “भाजपमुळे हातात पुस्तकांऐवजी दगड, तोंडात पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून..”, कॉंग्रेसचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
