🕒 1 min read
औरंगाबाद: गेल्या अनेक वर्षापासून क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याबाबत सातत्याने शिवप्रेमींची आणि जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची मागणी होती. त्या अनुषंगाने येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि शुभमुहूर्तावर नव्याने तयार करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करा अशी मागणी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण कार्यक्रम व्हावा अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिका करण्यात आली आहे. जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नुतन उत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. योग्य त्या प्रशासनिक कार्यवाही साठी प्रतिलिपि माहीतीस्तव जिल्हाधिकारी औरंगाबाद व पोलिस आयुक्त, औरंगाबाद शहर यांना सविनय सादर करण्यात आली आहे.
तात्काळ या कार्यक्रमासाठी या मान्यवरांना निमंत्रित करण्याचे नियोजन करावे अशी विनंती समस्त जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रकाश मुगदिया, तनसुख झाम्बड, राजू शिंदे, राजु दानवे यांनी केली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा होणाऱ्या क्रांती चौकात समितीद्वारे पाहणी दौरा संपन्न झाला. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण सोहळा लवकरच होणार असुन त्या सोहळ्याची पूर्वतयारी आणि नियोजन करण्यासाठी शिवजयंती महोत्सव समितीने महानगरपालिका अधिकार्यांसह या ठिकाणी पाहणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
-
डेव्हिड वॉर्नरने केलेल्या श्रीवल्ली डान्सस्टेप्सवर, अल्लू अर्जूनने केली कमेंट
-
“मुख्यमंत्री ठाकरे काल जनतेसमोर आले अन् विरोधकांचे धाबे दणाणले”
-
“हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे”, रामदास कदमांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
