Share

अदृश्य शिवभोजन थाळी आता १० रुपयात; सरकारच्या निर्णयावर भाजपचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळीही ३० सप्टेंबरपर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर येत्या एक ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीचा दर पूर्ववत दहा रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, शिवभोजन थाळीचीही संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश काल जारी करण्यात आला आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘१ ऑक्टोबर पासून म्हणे मोफत असलेली अदृश्य शिवभोजन थाळी १० रुपये मोजून घ्यावी लागणार आहे. शिवाय त्याची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. कुठे दिसली नाही कधी ही थाळी’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शिवभोजन थाळीला अदृश्य थाळी असे संबोधले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!