Share

छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?; दिपाली सय्यद यांचा सवाल

Published On: 

मुंबई: कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे  नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे. आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

“छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत? भाजपतुन बाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? भाजप त्यांना थांबवून दुसरी जागा का देत नाही? फक्त निवडणुकी पुरते भाजपला छत्रपती हवे होते का? याचे स्पष्टीकरण भाजपला द्यावेच लागणार!”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले आहे.

दरम्यान मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नसल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तर छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!