🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी करण्यास सुरू केले आहे. सोबतच त्यांच्या मुंबईस्थित वांद्रेभागातील घरातही कारवाई सुरु आहे. एकूण सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने कारवाई सुरू केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती.
सोमय्यांनी १०० कोटींचं वसुली प्रकरण लावून धरलं होतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर तपासादरम्यान सचिन वाझेनेही अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. परबांचे व्यावसायिक भागीदार संजय कदम यांच्या घरातूनही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल परब यांचा वरचष्मा असल्याची माहिती होती. यातूनच ईडीने आज कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान आता अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू होताच किरीट सोमय्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे pic.twitter.com/bIMek2Etew
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 26, 2022
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परबांनी आपल्या कपड्याची बॅग तयार ठेवावी असं सोमय्यांनी म्हटलं आहे. अनिल परब आणि संजय कदम यांचे संबंध आहेत. परब यांच्याविरोधात उद्धव ठाकरे सरकारनेच गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच परबांचा काटा काढल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
