Share

तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची गुप्तवार्ता विभागामार्फत चौकशी होणार : केसरकर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात काही दिवसांपूर्वी गैरव्यवहार झाला होता. तर या गैरव्यवहारा प्रकरणाची राज्य गुप्तवार्ता विभागामार्फत (सीआयडी) चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. शिवसेनच्या आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या मुद्यावर भाष्य केले होते. तेव्हा त्यावर उत्तर देताना केसरकर बोलत होते.
यावेळी केसरकर म्हणाले की, कुलस्वामिनी तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या- चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळाबाजार व गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी २००१ ते २००५ या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल.
दरम्यान राज्यातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळावरील चोऱ्या तसेच मौल्यवान मूर्ती व दागिने यांच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत परिपत्रकाद्वारे सर्व पोलीस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. देवस्थान ट्रस्टनी सुरक्षा रक्षकांची मागणी केल्यास त्यांना महाराष्ट्र सुरक्षा दलामार्फत ती पुरवली जाईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!