नागपूर : सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीवरून जगभरातील अमली पदार्थ फक्त महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष गटच पार पाडत आहे, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून राज्याला बदनाम करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला अशा पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे परिषदेत दिला आहे.
नागपूर येथे शुक्रवारी आयोजित जलदगती डीएनए तपासणी व वन्यजीव तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र हे बोलघेवड्यांचे राज्य नाही. येथे जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष विरोधी पक्षाला टोला लगावला आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले. यावरून २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक व्हायलाच हवे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

