मुंबई : आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील ‘अरुंधती’ या व्यक्तीरेखेने असंख्य महिलांना एक वेगळंच बळ दिलं आहे. आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढणाऱ्या अरुंधतीला हे बळ देणारे हातही एका स्त्रीचेच आहेत. लेखिका मुग्धा गोडबोले हे या मालिकेचं संवादलेखन करतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी या विशेष मुलाखती सांगितले की ..
त्या म्हणाल्या “आपल्याकडे ट्रोलिंग हा प्रकार भयंकर वाढला आहे. पण लेखक गेल्या दोन-अडीच वर्षांत कोणत्या परिस्थितीतून गेलेत, हे सांगून कळणं अवघड आहे. ट्रोलिंग झालं की खूप वाईट वाटतं. हे माध्यम असं आहे, की कोणीही याच्याविषयी काहीही बोलतं. क्रिकेट आणि टेलिव्हिजन ही दोन माध्यमं अशी आहेत की यांच्याविषयी कोणीही काहीही बोलतं. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की एखादी मालिका आवडली तर ती त्यातल्या कलाकारांमुळे आवडते आणि आवडत नाही तेव्हा लेखकांना वेड लागलंय असं म्हणतात. अशा वेळी असं वाटतं, जरा यामागे काय कष्ट आहेत किंवा ही यंत्रणा कशी आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज माझ्या डोक्यात आलं म्हणून मी लिहिलं असं नसतं. त्यामागे १५-१६ जणांची एक टीम असते. ही एक मोठी साखळी आहे, जे डोळ्यात तेल घालून स्क्रिप्ट वाचत असतात, त्याचा विचार करत असतात. पुढे काय करायचं याच्याविषयी सातत्याने बोलत असतात. फक्त लेखकाच्या हातात काही नसतं.
लेखक नशा करून लिहितात का, गांजा मारून लिहितात का, अशा पद्धतीने जेव्हा टीका होते, तेव्हा मला खरंच असं सांगावंसं वाटतं की मी जेव्हा पहाटे चार वाजता उठून एपिसोड लिहायला लागते. तेव्हा चार वाजता उठून नशा करते आणि लिहायला लागते, असं नसतं ना. आपण जे प्रेक्षकांना देत आहोत, त्यातून किमान रिस्पेक्टबलिटी मिळावी, मालिका आवडावी इतकीच अपेक्षा असते. त्यामुळे सरसकट लेखकांबाबत जे ट्रोलिंग केलं जातं, ते पाहून खूप वाईट वाटतं. लेखकांवर संस्कार झाले नाहीत का, असं ते जेव्हा म्हणतात, तेव्हा मला खरंच असं विचारावंसं वाटतं की, ज्या भाषेत तुम्ही आता लेखकांना शिव्या घालत आहात, ते कुठल्या संस्काराचं लक्षण आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

