Share

लोकांच्या मनातील राग मतपेटीतून बाहेर येईल – संजय राऊत

Published On: 

ठाणे : आजच्या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड होणार आहे. इडीबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले आहेत, ही माहिती संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना दिली. तपास यंत्रणांवर नेमका कोणता बॉम्ब टाकणार हे संजय राऊत यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे जाणून घेण्यासाठी लोकांचे लक्ष याकडे वेधले असलेले दिसते.

तसेच संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणा राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणत आहेत. या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग मी बाहेर काढणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यासह संजय राऊत एक्झिट पोल बद्दलही बोलले.

संजय राऊत म्हणाले एक्झिट पोल खोटे ठरतील एक्झिट पोलवर जाऊ नका, यापूर्वी एक्झिट पोलचा कसा फज्जा उडालाय हे आपण पाहिलंय. प्रत्यक्ष मतदानातून जे बाहेर येतंय त्यावर आपण मत व्यक्त करूया. असाही लोकांना सल्ला दिला. व म्हणाले “मला अजूनही खात्री आहे या देशात अनेक राज्यात प्रस्थापिंता विरोधात राग व संताप आहे”. ते मतपेटीतून स्पष्ट दिसेल आणि ईव्हीएम उघडल्यावरच लोकांच्या मनात काय आहे हे कळेल, लोकांच्या मनातील राग मतपेटीतून बाहेर येईल असे संजय राऊत मीडियाशी बोलताना म्हणाले. एक्झिटपोल खोटं ठरतील असं मला वाटते! हेही मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!