रत्नागिरी : संजय राऊत यांनी इडीबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले आहेत. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत जबरदस्त बॉम्ब फोडणार असे मत खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. म.वि.आ. च्या मुळावर जे-जे लोक येत आहेत त्याचा बिमोड करण्याचा निर्धार संजय राऊत यांनी घेतला आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण राऊत साहेबांबरोबर भक्कमपणे उभे आहोत. असे खा. विनायक राऊत म्हणाले.
निधी वाटपा बाबत प्रश्न विचारला तेव्हा ग्रामीण भागातील आमदारांना विकासासाठी जो निधी लागतो त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील गंभीर दाखल घेतली व ती जबाबदारी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविली गेली.
तसेच इडी,एनसिबी, सीबीआय यांचा वापर केंद्र सरकार आपल्या नोकराप्रमाणे करत आहे. असा आरोप त्यांनी रत्नागिरीत बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

