🕒 1 min read
औरंंगाबाद : आंतरराष्ट्रीय बीटकॉईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दुपटीने फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय भामट्यांनी शहरातील एका व्यापाऱ्याला १७ बीटकॉईन आणि रोख १० लाख रूपयांचा गंडा घातला. व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांविरूध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपेद्र शर्मा, पेडरिको गोईल्सल्हम बोरोंन्झो दासनोंसा, अॅड. अभिमन्यू एस अशी व्यापाऱ्यास गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय भामट्यांची नावे आहेत. शहरातील व्यापारी दिपक हंसराम पटेल (वय ३७, रा.केशरमनी, झांबड इस्टेट, श्रेयनगर) यांची २०१८ साली टेलीग्राम या सोशल नेटवर्कींग साईटवर दिपेंद्र शर्मा याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी दिपेंद्र शर्मा याने आंतरराष्ट्रीय बीटकॉईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळतो असे सांगून दिपक पटेल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दिपक पटेल यांच्याकडून १७ बीटकॉईन आणि रोख १० लाख रूपये घेतले होते.
बीटकॉईन देवून आणि पैसे भरूनही परतावा मिळत नसल्याने दिपक पटेल यांनी दिपेंद्र शर्मा व त्याच्या साथीदारांशी संपर्क साधला असता, ते उडवा-उडवीची उत्तरे देत होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर दिपक पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंतरराष्ट्रीय भामट्याविरूध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आजपासून फास्ट टॅग नसेल तर डबल टोल भरावा लागणार
- सर्वसामान्य मुली यापुढे पुढाऱ्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची हिम्मत करतील का ?
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- मोठी बातमी: गृहिणींच बजेट कोलमडणार; घरगुती एलपीजी सिलेंडरची दरवाढ
- तिसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार, तिकीट विक्रीला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
