Share

धोक्याची घंटा : औरंगाबादमध्ये मोठी लाट येण्याचा केंद्रीय आरोग्य पथकाचा इशारा

Published On: 

औरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक मास्कविना फिरत आहेत, खासगी रुग्णालयांमध्ये ताप आलेले अने रुग्ण दाखल होत आहेत, त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य पथकाने बुधवारी दिला आहे. ही लाट रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन आणि तपासणी वाढवण्याच्या सूचना पथकाने केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य पथकाने बुधवारी औरंगाबादमधील काही आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या तसेच शहरातील विविध ठिकाणी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती पथकाने व्यक्त केली. केंद्रीय अत्यावश्यक आरोग्यसेवा संचालक डॉ. रवींद्रन यांच्या नेतृत्वातील या पथकाने घाटीतील परिस्थितीचाही आढावा घेतला.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्यतज्ञ डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संकेत कुलकर्णी, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. रवींद्रन यांनी मास्कविना फिरणाऱ्यांवर कडक कारवाई कराण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक, रुग्णालय, प्रशासकीय अशा विविध स्तरावर कडक उपायोजना करण्याच्या सुचना दिल्या. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तपासणी, कंटेनमेंट झोन वाढवा. रुग्ण तत्काळ शोधण्यासाठी डॉक्टर, आशा वर्कर, निरीक्षकांना प्रशिक्षण द्या, अशीही सूचना यावेळी आरोग्य पथाकाने केल्या. यावेळी डॉ. प्रदीप आवटे यांनी रुग्णवाढीच्या प्रमाणात नियंत्रणात्मक उपाययोजनांचे नियोजन करावे. तसेच मृत्यू प्रकरणांचा अभ्यास करून ते कसे रोखता येतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!