🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा पार केला. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाच्या ५३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ४४३, तर ग्रामीण भागातील ८९ रुग्णांचा समावेश आहे. तर बुधवारी एकाच दिवसात सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, २३१ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देखील देण्यात आली. औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १८%, रिकव्हरी रेट ८९% तर मृत्युदर २.४ टक्के आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ४३९ वर पोहोचली आहे. यातील ४९ हजार ६१३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली, त्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५१५ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींचा आकडा १ हजार ३११ वर पोहोचला आहे.
मनपा हद्दीत ४४३ नवे रुग्ण
घाटी परिसर (6), हरीराम नगर (1),आदित्य नगर (2), सातारा परिसर (4), आयएमए हॉल (1), एन-8 सिडको (4), पीर बाजार (1), जालन नगर (2), स्टेशन रोड परिसर (2), बीडबाय पास परिसर (9), मयूर पार्क (3), सिडको (12), मुकुंदवाडी (3), कैलास नगर (2),संजय नगर (2), एन-5 सिडको (4), एन-9 सिडको (3), उस्मानपुरा (4), शहानूरवाडी (6), पिसादेवी रोड परिसर (1), त्रिमूर्ती चौक (2),भवानी नगर (2),चिकलठाणा (2),एन-6 सिडको (5),पडेगाव (2), अजबनगर (2), तापडिया नगर (1), हिंदुस्थान आवास (2),एसबीएच कॉलनी (3), पुष्प नगरी (4), शिल्प नगर (1), औरंगपुरा (1), श्रीनिकेतन कॉलनी (1), बालाजी नगर (7), वेदांत नगर (2), कांचनवाडी (1), ज्योती नगर (2), एन-2 सिडको (8), प्रताप नगर (4), गारखेडा (6), पुंडलिक नगर (4),बन्सीलाल नगर (2),रेल्वे स्टेशन परिसर (5), पद्मपुरा (1), एकनाथ नगर (1),जाधववाडी (1),नाथ व्हॅली रोड परिसर (1),जटवाडा (2),टिव्ही सेंटर (1), समर्थ नगर (2), शाह कॉलनी (1), उल्कानगरी (9),मनीष कॉलनी (1), शेरवन टावर (2), सराफा रोड (1), हायफिल्ड प्रा.लि (1), हर्सूल (8),शास्त्री नगर (2),शाकुंतल नगर (1),न्यायमूर्ती नगर (1), शाह बाजार (1), हडको (3), नवीन मोंढा (1), शिवेश्वर कॉलनी (1), माऊली नगर (4), बजाज हॉस्पिटल (1), पैठण रोड परिसर (1), जयसिंगपूरा (1), एन-3 सिडको (1),म्हाडा कॉलनी (1), हायकोर्ट परिसर (2), टाऊन सेंटर (1), एन-4 सिडको (4), कामगार चौक (1), जय भवानी नगर (7),संघर्ष नगर (1), शाहनगर (1), हनुमान नगर (4), हॉटेल फर्न रेसिडेन्सी (1), एन-7 सिडको (5), आकाशवाणी (3),स्वामी विवेकानंद नगर (1),खिवंसरा पार्क (1),बजरंग चौक (2), शिवाजी नगर (7), संदेश नगर (1), गजानन नगर (1), गादिया विहार (1), मेहेर नगर (1),विष्णू नगर (3), मयूरबन कॉलनी (1), देवळाई परिसर (3), चौरंगी हॉटेल (1), सिंधी कॉलनी (3),शंभू नगर (1), अग्निहोत्री चौक (1), शिवशंकर कॉलनी (3), कलेक्टर ऑफीस परिसर (1), सिंधू कॉलनी (1), नक्षत्रवाडी (1), शिवनेरी कॉलनी (1), व्यंकटेश नगर (1), सेंट्रल नाका (2), टिळक नगर (3), सुराणा नगर (2), राम नगर (1), सदानंद नगर (1), सह्याद्री नगर सिडको (1), दशमेश नगर (2), श्रेय नगर (2), इटखेडा (3), आरटीओ ऑफिस परिसर (1), सिद्धार्थ नगर (1), राधामोहन कॉलनी (1), खडकेश्वर (1), नागेश्वरवाडी (2), अन्य (162)
ग्रामीण भागात ८९ नव्या रुग्णांची नोंद
गंगापूर (1), करमाड (2),वरुडकाझी (1), बजाज नगर (16), वडगाव (4), वाळूज महानगर (4),सिडको महानगर (2),पंढरपूर (1), वळदगाव (1),पैठण(1),खुलताबाद(1),शेंद्रा (2), वडगाव (1), अन्य (52)
सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत माळीवाडा, औरंगाबाद येथील 64 वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनी, गारखेडा येथील 70 वर्षीय पुरूष, सांगवी, लासूर स्टेशन येथील 75 वर्षीय पुरूष , खुलाताबाद तालुक्यातील आझमपूर येथील 60 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये नारळीबाग येथील 37 वर्षीय पुरूष, क्रांती चौकातील 70 वर्षीय स्त्री, श्रद्ध हॉस्पीटल परिसरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
- धोक्याची घंटा : औरंगाबादमध्ये मोठी लाट येण्याचा केंद्रीय आरोग्य पथकाचा इशारा
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
