🕒 1 min read
पुणे : शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महिना होत नाही तोपर्यंत आता शिवसेनेशी पूर्व संबंध असलेल्या पोलीस अधिकरी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. यामुळे, सद्या शिवसेनेवर दबाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड ते सचिन वाझे यांच्यापर्यंत कसा शिवसेनेवर दबाव वाढला हे खालील काही घटनांवरून जाणण्याचा प्रयत्न करूयात…
संजय राठोड यांचं प्रकरण –
पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध संजय राठोड यांच्याशी जोडले गेल्यानंतर या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही किल्प्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता.
यानंतर संजय राठोड हे काही दिवस नॉट रिचेबल होते. अखेर, २३ फेब्रुवारी रोजी ते सर्वांसमोर आले होते. मात्र, पोहरादेवी येथील हा दौरा त्यांच्या राजीनाम्यास अधिक कारणीभूत झाल्याचं सांगितलं जात आहे. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थिति वाढत असल्याने उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं होतं.
मात्र, संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनास हजारोंचा समुदाय जमलं होता. यामुळे एका मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याची टीका सुरु झाली होती. यानंतर कोणीही गर्दी करून नये असं आवाहन आपण समर्थकांना केल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं. तर, आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगत आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र, संजय राठोड यांच्यामुळे जमलेल्या जमावामुळे कोरोनाला चांगलच खतपाणी मिळाल्याचं यानंतर समोर आलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर असताना या सर्व घडामोडी सुरु असल्याचं दिसून येत होतं. तर, भाजपने देखील सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. अधिवेशन काळात सरकारची डोकेदुखी वाढू शकते, यामुळे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने देखील दबाव टाकल्याचं बोललं जातंय. खुद्द शरद पवार यांनी देखील या प्रकरणात नाराजी व्यक्त केली होती.
धनंजय मुडें प्रकरण –
दुसरीकडं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील रेणू शर्मा यांनी अत्याचाराचे आरोप केले होते. याकाळात त्यांचा देखील राजीनामा घेतला जावा अशी मागणी जोर धरत होती. तर, शरद पवार यांनी देखील तसे संकेत दिले होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. पुढे, राजकारण होत असल्याने रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. यानंतर, बीड मध्ये धनंजय मुंडे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. कुत्रही क्रेनने हार घातला गेला तर कुठे जेसीबीने फुले उधळली गेली. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध लक्षात गेहता सावध भूमिका घेतली होती.
धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांनी देखील मुडेंवर गंभीर आरोप केले. मात्र, याची फारशी दखल घेतली गेली नाही. राष्ट्रवादीमधून मुंडेंना समर्थन देखील मोठं होतं. यामुळे रेणू शर्मा यांनी तक्रारच मागे घेतल्यानंतर राजीनाम्याची चर्चाच संपली.
पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासावर देखील संशय घेतला गेला. तसेच, संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याचं बोललं जात होतं. शिवसेनेवर भाजपसह मित्रपक्षांचा वाढत दबाव व शिवसेनेतील नेत्यांची राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी घेता त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सोपवावा लागला. तर, चौकशी पूर्ण होईपर्यंत हा राजीनामा मंजूर करू नये यासाठी संजय राठोड यांनी देखील दबाव टाकल्याचं बोललं जात होतं.
सचिन वाझे प्रकरण –
आता, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळललेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्र्यातील खाडीत मृतदेह आढळून आला. हिरेन यांच्या मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ अधिक वाढलं आहे. तर, हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या गाडीमध्ये जिलेटीन कांड्या आढळल्या ती गाडी सचिन वाझे यांच्याकडे गेले चार महिने होती, वाझे व हिरेन यांची ओळख होती, तसेच त्यांनीच बोलावल्यामुळे हिरेन गेले होते, मात्र परत आले नाहीत असे आरोप पोलिसांना दिलेल्या जबाबात हिरेन यांच्या पत्नीने केले आहेत.
भाजपने याप्रकरणी NIA च्या चौकशीसह सचिन वाझे यांचे निलंबन करून अटक करावी अशी मागणी केली आहे. २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा देखील भाजपने उचलून धरला आहे. साहजिकच, मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंकडे असल्यामुळे त्यांना व गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं जातंय. मात्र, शिवसेनेशी असलेला संबंध जोडून शिवसेनेवर अधिक दबाव टाकला जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सचिन वाझे यांचे २००८ नंतर शिवसेनेशी कोणतेही संबंध नव्हते असं सांगितलं आहे. अद्यापही सचिन वाझे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसून एटीएस मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तर NIA अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
