उस्मानाबाद : तुळजापूर येथे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या कारणावरून झालेल्या बैठकीत नगर पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना निरर्थक आरोप करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी शिविगाळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचा मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तर २२ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी आयोजित बैठकीत पालिकेचे मुख्याधिकारी तसेच पालिका कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जातीवाचक भाषा वापरण्यात आली. यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबत संबंधित व्हिडीओ क्लिप देण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आदींना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा शेतकरी आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा !’
- कोणीतरी पुड्या सोडतंय भाजपा सोडून कोणीही जाणार नाही – फडणवीस
- उद्धव ठाकरेंनी अर्थव्यवस्था समजावून सांगावी; राणेंचं थेट आव्हान
- ‘मी सुद्धा हिंदू आहे…’ तांडवच्या वादात उडी घेतल्यानंतर स्वरा भास्कर ट्रोल !
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

