🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे गटातील अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत आहेत. आमदार मंगेश कुडाळकर यांनीही एकनाथ शिंदेंचा सत्कार समारोह ठेवला होता. मात्र या कर्यक्रमात कार्यकर्त्यांच्या गोंधळात स्टेजवर ठेवेलेले महापुरुषांचे फोटो खाली पडले आणि याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही.”, असे ट्वीट करत या घटनेचा अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे.
राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही.#निषेध pic.twitter.com/Yw5hQpgLMM
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 17, 2022
‘या’ तारखेला होणार शिंदे-ठाकरे याचिकेवर सुनावणी-
शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेशी बंड करत सत्तास्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती, याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. यावर ११ जुलैच्या सुनावणीत पुढील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच सदरील प्रकरण सरन्यायाधीश रमण यांनी खंडपीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
दरम्यान बुधवारी (२० जुलै) सरन्यायाधीश रमण, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरी ते राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी देईल.
महत्वाच्या बातम्या:
- Shinde VS Thackeray : शिवसेना-शिंदे गट संघर्ष; ‘त्या’ याचिकेवर बुधवारी होणार सुनावणी
- Nitesh Rane : सेनेचा NDA ला पाठींबा असताना राऊत विरोधकांसोबत का? ; राणे बंधूंनी ‘निष्ठावंत’ म्हणत डिवचले
- Sanjay Raut : ‘प्रेमरोगा’ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय होणार?; शिवसेनेची शिंदे-फडणवीसांवर टीका
- IND vs ENG : ऋषभ पंतचा शतकी तडाखा अन् हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी; भारताचा ५ गडी राखून विजय
- IND vs ENG : हार्दिक पंड्याच बेस्ट! दमदार बॉलिंगमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
