Share

ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान सर्वात जास्त चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे टूलकिटचा. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटाने सर्वात आधी ही टूलकिट सार्वजनिक केली होती. यात शेतकरी आंदोलनावरून भारत सरकारचा विविध देशांमध्ये कशा पद्धतीने विरोध करायचा, याची इत्थंभूत माहिती होती. नंतर ग्रेटाने ते ट्वीट डिलीट करून टाकले. परंतु तत्पूर्वीच जगभरात त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. यावरून भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवरून अपप्रचाराचे मोठे कुभांड रचले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने व काही सेलिब्रिटींनी केला होता.

टूलकिटच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कट!
ग्रेटाला ही टूलकिट कोणी उपलब्ध करून दिली? शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने भारताची बदनामी करण्यासाठी एवढ्या सूक्ष्म पातळीवर नियोजन कोणी केले? हे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. याचाच परिणाम म्हणून दिल्ली पोलिसांनी 4 फेब्रुवारी रोजी ग्रेटाविरुद्ध गुन्हा दाखल न करता ग्रेटाने शेअर केलेल्या टुलकिटच्या लेखकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी बंगळुरूतून पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली.

दिशा रवीला कोर्टापुढे हजर केल्यानंतर तिला 5 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली होती. तिच्याच चौकशीतून निकिता जेकब आणि शांतनू ही नावे समोर आली आहेत. आता दिल्लीच्या कोर्टाने निकिता जेकब आणि शांतनु यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहेत. पोलिस दोघांचाही शोध घेत असून त्यांची माहिती मिळताच त्यांना अटक केली जाईल. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिशा, निकिता आणि शांतनु ही तीन नावे देशभरात चर्चिली जात आहेत. त्यांचीच येथे माहिती देत आहोत.

कोण आहे निकिता जेकब?
निकिता जेकब एक कार्यकर्ती आणि वकील आहे. टूलकिटचा वाद समोर आल्यावर निकिताने आपले ट्विटर अकाउंट डिलीट केले. निकिताने ट्विटर प्रोफाइलवर स्वत:ची ओळख मुंबई उच्च न्यायालयातील वकील, आम आदमी पार्टी (आप) ची सदस्य म्हणून केल्याचा दावाही केला जात आहे. नव्या प्रोफाइलमध्ये तिने ‘आप’चे कनेक्शन काढून टाकले आहे. तथापि, एका युझरने- विजय पटेलने असा दावा केलाय की, निकिताने 30 जानेवारी 2021 रोजी ‘सॉलिडेरिटी विद इंडियन फार्मर्स’ नावाचे एक कागदपत्र तयार केले होते. तिच्या इन्स्टाग्रामवर न्यूज इन्फ्यूज नावाचे खाते आहे, ज्याद्वारे ती सतत प्रचार-प्रसार करते. दिल्ली पोलिसांच्या मतानुसार, मुंबई हायकोर्टाची ही तथाकथित वकील टूलकिट प्रकरणात तिचे नाव समोर आल्यापासून फरार आहे. देशविरोधी मोहिमेत भाग घेतल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिनेच पोएटिक जस्टिसचा फाउंडर धालीवालसोबत झूमवर झालेल्या मीटिंगमध्ये शेतकरी आंदोलनासाठीचा कृति आराखडा तयार केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

कोण आहे शांतनू?
शंतनू हादेखील एक कार्यकर्ता आहे. दिल्लीच्या कोर्टाने सोमवारी त्याच्याविरुद्धही अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. दिशा रवीच्या चौकशीतूनच त्याचे आणि निकिताचे नाव समोर आल्याचे सांगितले जात आहे. देशाविरोधात ऑनलाइन कृति आराखड्यात त्याचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. खलिस्तान्यांशी संगनमत करून देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

कोण आहे दिशा रवी?
उत्तर बंगळुरूच्या सोलदेवाना हल्ली भागातील पर्यावरण कार्यकर्ती 21 वर्षीय दिशाने माउंट कार्मेल कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ती सध्या गुड माइल्ड कंपनीत कार्यरत आहे. दिशा रवीचे वडील म्हैसुरूमध्ये अथलेटिक कोच असून आई गृहिणी आहेत. ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या अभियानाची ती संस्थापक आहे. व्होग मॅगझिनने दिशाला पर्यावरणाच्या संकटाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या जगातील चार महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केले होते. ती नियमितपणे न्यूज पोर्टलसह सोशल मीडियावर स्तंभ लिहिते आणि युवक आणि किशोरवयीन कार्यकर्त्यांसाठी पर्यावरणासंबंधित अभियान चालवते. अटकेनंतर दिशाने आपण टूलकिटमधील केवळ दोन ओळी संपादित केल्याचे कोर्टापुढे सांगितले आहे.

टूलकिटची नेमकी भानगड काय?
ग्रेटाने शेअर केलेल्या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा कसा द्यायचा, कोणत्या वेळी कोणते हॅशटॅग वापरायचे, कोणत्या दिवशी सामूहिक आंदोलन करायचे, विविध देशांमध्ये भारतीय दूतावासाला घेराव कसा घालायचा, एवढेच नाही, तर नेमके काय करावे आणि काय करू नये, याचे तपशीलवार तारखेसह वर्णन होते. 3 फेब्रुवारी रोजी कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत हे टूलकिट सोशल मीडियावर शेअर केले. परंतु नंतर तिने स्वत: ते ट्वीट डिलीट केले होते.

खलिस्तान्यांशी संगनमत?
या घडामोडीदरम्यान टूलकिट प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. मीडिया रिपोट्सनुसार, दिशा आणि निकिता यांनी ‘झूम’ अॅपवर प्रो-खालिस्तानी असलेल्या पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक मो. धालीवाल यांच्याशी चर्चा केली होती. 26 जानेवारी रोजी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात जनतेचे समर्थन मिळवण्याचा त्यांचा हेतू होता. पोएटिक जस्टिस ही कॅनडास्थित खलिस्तान समर्थक संघटना आहे. या संघटनेच्या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात भारतविरोधी फेक न्यूज आणि लेख आहेत. शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांचा नरसंहार झाल्याची चिथावणीखोर माहितीही त्यांच्याच डोक्यातील कल्पना आहे. शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून मरणासन्न झालेली खलिस्तानी चळवळ पुन्हा एकदा जिवंत करण्याचा त्यांचा हेतू आहे. शीखांवर अनन्वित अत्याचार होत असल्याची ओरड त्यांच्या प्रचारामधून दिसते. एवढेच नाही, तर विविध देशांतील संसदेतून भारतावर दबाव आणण्यासाठीही ते प्रयत्नरत आहेत, असा दावा केला जातोय.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!