Share

चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : शहरात विविध विकासकामे सुरू आहे. उड्डाणपुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, काही अडचणी येतात. पण अधिकारी उत्तम काम करीत आहेत. चांगले काम अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान टोचले. काही महिन्यांपूर्वी पूर्व नागपुरातील नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला होता.

चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, असे त्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींना सांगितले. पुढील वर्षभरात ५० विकास कामांचे उद्घाटन करण्यात येईल, असे नमुद करीत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचे संकेत दिले. पुढील काही काळात पूर्व नागपुरात ७ तर उत्तर नागपुरात ३ विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रकल्पाचा पुनरुच्चार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या बदलत्या चेहऱ्यासाठी गडकरी यांची स्तुती केली.

नागपूर-हैदराबाद मार्गावरील चिचभवन येथील अत्याधुनिक रेल्वे ओव्हर ब्रिजचा लोकार्पण सोहळा वर्धा मार्गावरील साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या सभागृहात पार पडला. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ऑनलाइन पद्धतीने कळ दाबून लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, खासदार डॉ. विकास महात्मे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे यांच्यासह इतर आमदार, नगरसेवक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!