Share

कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : राज्यासह देशभरात गेल्या वर्षी कोरोनाने हाहाकार माजवला होता. याकाळात राज्यात मुंबई-पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार व महापालिकांनी मिळून जम्बो कोव्हीड सेंटर्स निर्माण केले होते.

याची रुग्णालयांची निर्मती जलदगतीने झाल्यानंतर तिथे उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, इतर कर्मचाऱ्यांची उणीव असल्याचं दिसून आलं. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतः प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली, पण कोरोनाच्या भेटीने अर्ध्याहून कमी कर्मचारी रुजू झाले. अशा संकटाच्या काळात सुमारे ६५० ते ७०० गरजू नागरिकांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता.

इतर उदरनिर्वाहाचे साधन कोरोना काळात ठप्प झाल्याने या सेवेमार्फत पोटापाण्याचा प्रश्न देखील सुटेल या आशेने हे सर्व नागरिक विविध पदांवर रुजू झाले. ज्या रुंगांच्या संपर्कात नातेवाईक देखील येणे टाळायच्या त्यांची सेवा या कर्मचाऱ्यांनी केली. स्वतःच्या कुटुंबातील लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याने काळजीपोटी या कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांपासून देखील लांब राहावं लागलं होतं.

आता, कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्याने कोव्हीड सेंटर्स देखील बंद करण्यात येत आहेत. मात्र, यामुळे या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६५० ते ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गेल्या १ तारखेला या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं असून हे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेली आश्वासने न पाळल्याचा दावा या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कोव्हीड योद्धा सन्मानपत्र फक्त दिखाव्यासाठी देण्यात आला असून प्रत्यक्षात उपेक्षाच पदरी पडल्याच्या संतप्त भावना या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आजही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयीन सेवांसाठीच्या ३ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. या जागा भरताना प्राधान्य मिळावं, कोरोना काळात जीवाची बाजी लावून केलेल्या सेवेचे योग्य सन्मान व्हावा, अनेकांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तात्काळ यावर पर्यायी मार्ग काढावा. कायमस्वरूपी रुजू करण्यात यावे, यासह इतरही मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी महापालिकेबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा १५ वा दिवस असून महापालिकेला जाग कधी येईल ? असा उद्विग्न सवाल कर्मचाऱ्यांमार्फत केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!